Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील महिलेचा डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.
महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत, ज्या “नचदे ने सारे” या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका घरगुती कार्यक्रमामध्ये “नचदे ने सारे” या बॉलिवूड गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतेय. यावेळी ती करत असलेला डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधत आहेत. शिवाय यावेळी डान्स करताना तिच्या डोक्यावर पदरही होता. हे पाहून मर्यादेत राहूनही कला सादर करता येत असे अनेकांनी म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @cutiepie1601 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
एकाने लिहिलंय की, “सुंदर डान्स केला पण तिच्या मर्यादा ओलांडल्या नाही”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “काकू काय नाचला तुम्ही”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खरंच भारी नाचला तुम्ही.”
