Viral Video: सोशल मीडियावर सध्या महिलांचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. विविध गाण्यांवर आकर्षक स्टेप्स, भन्नाट एक्स्प्रेशन आणि हटके डान्समुळे हे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अनेक तरुणी आपल्या डान्सची कला सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करत असून, त्यांच्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाइक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज मिळताना दिसतात. सोशल मीडियामुळे अशा कलाकारांना आपली कला घरबसल्या मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे.
सोशल मीडिया हे आज केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिले नसून आपली कला आणि कौशल्य सादर करण्याचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. डान्स, गायन, अभिनय, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांचा व्हिडीओ तयार करून कलाकार तो सोशल मीडियावर शेअर करू शकतात. त्यामुळे कोणत्याही मोठ्या व्यासपीठाची किंवा संधीची वाट न पाहता आपली कला थेट लाखो लोकांपर्यंत पोहोचवता येते. अनेक नवोदित कलाकारांना सोशल मीडियामुळे ओळख मिळाली असून, त्यांच्या कलागुणांना नवी दिशा मिळत आहे.
गौरी-गणपतीच्या उत्सवानिमित्त सध्या सोशल मीडियावर महिलांच्या विविध रिल्स पाहायला मिळत आहेत. अनेक महिलांनी पारंपरिक साडी, दागिने आणि आकर्षक वेशभूषा करत गौरीच्या गाण्यांवर सुंदर रिल्स बनवल्या आहेत. काही जणी पारंपरिक नृत्य करताना, तर काही जणी गाण्याच्या तालावर अभिनय आणि हावभाव सादर करताना दिसत आहेत. त्यामुळे गौरी-गणपतीच्या उत्सवाचा आनंद आणि उत्साह सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
गौरी-गणपतीच्या उत्सवानिमित्त सध्या सोशल मीडियावर विविध पारंपरिक नृत्यांचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये एक महिला कोळी समाजाच्या पारंपरिक पोशाखात तलावाच्या किनारी ‘कौलारू माडी गं’ या गौराईच्या गाण्यावर सुंदर नृत्य करताना दिसत आहे. पारंपरिक वेशभूषा, निसर्गरम्य वातावरण आणि गाण्याच्या तालावर केलेले तिचे नृत्य यामुळे हा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. तिच्या नृत्यातून पारंपरिक संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @payal_vilas_patil
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गं सुंदर” एका युजरने लिहिलेय, “अस्सल नृत्य” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर नाचलात ताई”
