Viral Video: सोशल मीडियामुळे आज अनेक सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करणाऱ्या कलाकारांना आपल्या कलेला योग्य व्यासपीठ मिळाले आहे. पूर्वी परिस्थितीमुळे अनेक कलाकारांना मोठ्या मंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळत नव्हती. मात्र, सोशल मीडिया प्रत्येकासाठी खुले असल्याने मोबाईलच्या माध्यमातूनही कलाकार आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. अनेक कलाकारांनी नृत्य, गायन, अभिनय, वादन, चित्रकला तसेच पारंपरिक कलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यांना नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळाली. काही कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना कार्यक्रमांच्या ऑफर्स, जाहिराती आणि कामाच्या नव्या संधी मिळाल्या. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही आपल्या कलेच्या जोरावर अनेक कलाकारांना प्रसिद्धी आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मिळाले आहेत. सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा माध्यम न राहता, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक महिलांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आपल्या कलागुणांनी, नृत्याने, गायनाने, हटके अंदाजाने किंवा दैनंदिन आयुष्यातील खास क्षणांमुळे अनेक महिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. काही व्हिडीओंना इतकी पसंती मिळते की ते काही वेळातच मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात आणि चर्चेचा विषय ठरतात.

डान्स ही अनेकांची आवडती कला असून, नृत्याच्या माध्यमातून आपल्या भावना आणि आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य करायला आवडते. सध्या सोशल मीडियामुळे या कलेला मोठे व्यासपीठ मिळाले आहे. अनेक हौशी कलाकार आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यातील काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात आणि पाहता पाहता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यामुळे अनेकांना आपल्या नृत्यकलेची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला ‘कोयल सी तेरी बोली’ या गाण्यावर अतिशय सुंदर आणि उत्स्फूर्तपणे डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ती डान्स करत असताना तिचा लहान मुलगाही तिची साथ देताना दिसतो. आईच्या डान्सच्या स्टेप्स पाहून तोही उत्साहाने तिच्यासोबत ठेका धरतो. आई-मुलाची ही गोड केमिस्ट्री आणि डान्समधील उत्साह नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेकजण या मायलेकाच्या सुंदर क्षणाचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Chaitali Sarkar (@chaitalisarkar418)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @chaitalisarkar418
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरी कलाकार” एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर नाचलीस गं” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर”