Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मनोरंजन, नृत्य, गायन, कला, विनोदी प्रसंग तसेच दैनंदिन आयुष्यातील खास क्षणांचे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा एखादा साधा आणि अनोखा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो. त्यामुळे सामान्य व्यक्तींनाही आपल्या कला-कौशल्याला प्रसिद्धी मिळवण्याची संधी मिळत आहे.
खेडेगावातील महिलांचे दैनंदिन जीवन अनेक जबाबदाऱ्यांनी व्यापलेले असते. घरातील कामकाज, शेतीची कामे, मुलांची काळजी आणि कुटुंबाच्या इतर जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महिलांना आपल्या अंगी असलेली कला आणि कौशल्य जोपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. नृत्य, गायन, अभिनय किंवा इतर कलांची आवड असूनही योग्य व्यासपीठ आणि संधीअभावी अनेक महिलांची कला घराच्या चौकटीतच मर्यादित राहते. मात्र, सोशल मीडियामुळे परिस्थितीत काही प्रमाणात बदल झाला आहे. मोबाईलच्या माध्यमातून महिला घरकाम किंवा शेतीची कामे सांभाळत असतानाही आपल्या आवडीच्या कलेचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करू शकतात. त्यांच्या या कलागुणांना नेटकऱ्यांची पसंती मिळाल्यास व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन त्यांना नवी ओळख आणि प्रसिद्धी मिळू शकते.
आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका खेडेगावातील महिला ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, साधा पारंपरिक वेश परिधान करून या महिलेने अतिशय सहज आणि मनमोहक अंदाजात नृत्य सादर केले आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि नृत्याची सुंदर शैली नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कोणत्याही मोठ्या मंचाची किंवा आकर्षक पोशाखाची गरज नसतानाही आपल्या कलेच्या जोरावर या महिलेने सोशल मीडियावर आपली वेगळी छाप पाडली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण तिच्या नृत्याचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @royal_vanita_bai
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजी… आपण खऱ्या शेतकरी कन्या आहात… अभिमान आहे तुमचा..” एका युजरने लिहिलेय, “मस्तच आनंदी रहायला वायाच काय देणंघेणं ” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर ताई”
