Viral Video: हल्ली सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. लोकप्रिय मराठी, हिंदी तसेच ट्रेंडिंग गाण्यांवर तरुण-तरुणी, महिला आणि लहान मुलांचे डान्स व्हिडीओ यूजर्सचे लक्ष वेधून घेतात. भन्नाट स्टेप्स, आकर्षक वेशभूषा आणि हटके अंदाजामुळे असे व्हिडीओ काही वेळातच मोठ्या प्रमाणावर शेअर आणि व्हायरल होतात.

हल्ली सोशल मीडियामुळे बॉलिवूडची गाणी केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर ती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड गाण्यांवर डान्स करणारे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने या गाण्यांची लोकप्रियता देशाच्या सीमा ओलांडून जगभरात वाढताना दिसत आहे.

सोशल मीडियामुळे आज अनेकांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळून त्यातून चांगली कमाई करण्याची संधी मिळत आहे. विशेषतः डान्स, गायन, अभिनय, कॉमेडी आणि विविध प्रकारच्या क्रिएटिव्ह कंटेंटला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यास क्रिएटर्सना जाहिराती, ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सरशिप आणि इतर माध्यमांतून उत्पन्न मिळू शकते.

गृहिणींसाठीही सोशल मीडिया हे आपल्या कलागुणांना जगासमोर आणण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. घर-संसार सांभाळतानाच अनेक गृहिणी डान्स, गायन, पाककला, चित्रकला, हस्तकला अशा विविध कला सादर करून सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या व्हिडीओंना प्रेक्षकांची पसंती मिळाल्यास प्रसिद्धीसोबतच कमाईची संधीही मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला ‘तेरे रंग में भी मस्ती भरी है’ या गाण्यावर सुंदर अंदाजात डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्सच्या आकर्षक स्टेप्स आणि उत्साही अंदाजाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Dipika Sarkar (@dipikasen557)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dipikasen557 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “काकू तुमचा डान्स एकच नंबर” एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स केलात काकू” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई काय सुंदर नाचलात”