Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका हळदीतील सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला अतिशय सुंदर डान्स करताना दिसतेय.

समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक महिला खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

लग्नात हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते. अगदी डीजे, बॅंजो ठेवला जातो. या बेंजोवर सगळे थिरकतात, डान्स करतात मजा करतात. लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात.याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा.

काही गाणी अक्षरशः काळ गाजवतात. कितीही जुनी झाली तरी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला त्या गाण्यावर थिरकल्या शिवाय राहवत नाही. अभिनेत्री श्रीदेवीचे ‘मेरे हाथों में नौ नौ चूडियां’ हे प्रसिद्ध गाणं आजही लग्न समारंभामध्ये वाजवले जाते. याच गाण्यावर एका महिलेने जबरदस्त डान्स केला आहे. जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हळदीच्या कार्यक्रमामध्ये एका महिलेच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ही महिला ‘मेरे हाथों में नौ नौ चूडियां है’ या गाण्यावर सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Dance fever with kiran????❤️ (@kiran_phulpagare07)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kiran_phulpagare07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूपच सुंदर नाचलात ताई”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आई गं किती छान डान्स केलास”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “याला बोलतात खूप भारी डान्स”