Dance Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘धुरंधर’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला असून यातील अनेक सीन आणि गाणी सुपरहिट ठरत आहेत. या चित्रपटातील ‘नाल नचना’ हे गाण्याने अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या याच गाण्यावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय.
हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या धुरंधरमधील चर्चेत असलेल्या ‘नाल नचना’ गाण्यावर महिला डान्स करताना दिसतोय.
डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या घरामध्ये “नाल नचना” या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या महिलेचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या महिलेचं खूप कौतुक करत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @itishreeitishree या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “व्वा काकू खूप छान नाचलीस”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “यांच्यासारखं कोणीच नाचू शकत नाही”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “मी तुमचा फॅन झालो ताई.”
