Viral Video: हल्ली सोशल मीडियामुळे प्रत्येकाला आपली कला सादर करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे. अनेकजण डान्स, गायन, अभिनय, चित्रकला किंवा इतर विविध कलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे, एखादी कला आवडली तर काही क्षणांतच तिचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. त्यामुळे कलाकारांना आपली कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते.
हल्ली अनेक गृहिणी घरातील जबाबदाऱ्या सांभाळत सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करताना दिसतात. घरबसल्या त्या स्वयंपाक, बेकिंग, डान्स, मेकअप, हस्तकला, फॅशन अशा विविध क्षेत्रांतील आपली कला आणि कौशल्ये ब्लॉगच्या माध्यमातून सादर करू लागल्या आहेत. त्यांच्या या कलांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक गृहिणींना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधीही मिळत आहे.
सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात किंवा सोशल मीडियाद्वारे डान्स करून आपली आवड पूर्ण करतात.
आता सोशल मीडियावर एका महिलेचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती खानदेशी ‘फिरी फिर नाच पोरा’ या गाण्यावर उत्साहात डान्स करताना दिसत आहे. तिच्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील उत्साहामुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा डान्स पाहून अनेकजण तिच्या उत्स्फूर्त अंदाजाचे कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @anita_savarkar_5732या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “नजर काढा काकू तुमच्या केसांची” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “आई तुमचे केस खूपच छान आहेत, आणि छान डान्स केलात” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आईशप्पथ! खूप मस्त डान्स काकी” आणखी एकाने लिहिलेय,, “काकी लयभारी डान्स केलात”
