Viral Video: हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका खेडेगावातील एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक ती खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशीच एक महिला आहे, ज्यात ती ‘प्रेम रतन धन पायो’ या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गावातील महिला घराबाहेरच्या परिसरात ‘प्रेम रतन धन पायो’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतेय. यावेळी ती करत असलेला डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधत आहेत. हा डान्स ती तिच्या पतीकडे पाहून करत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kiran_bag_0395 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “काकू खरंच तुम्ही हिरोईनपेक्षा भारी नाचलात”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “काकू लयभारी नाचला तुम्ही”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काकू तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “चित्रपटातील डान्सपेक्षा सुंदर डान्स”