Viral Video: महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत, ज्या ‘राजा जी के तुरल’ या भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भोजपुरी गाण्यांवरील डान्समुळे सतत चर्चेत येणारी ही आता पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त डान्समुळे चर्चेत आली आहे. यावेळी ही महिला एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गेली असून यावेळी ती काही मुलींबरोबर डान्स करताना दिसतेय. यावेळी ही महिला ‘राजा जी के तुरल’ या प्रसिद्ध भोजपुरी गाण्यावर नेहमीप्रमाणे बेभान होऊन नाचते. महिलेचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “क्या बात है”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू काय जबरदस्त डान्स केलात”,तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू तुम्ही या वयात पण भारी नाचता”
