Viral Video: भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल.

खेड्यातील अनेक महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतं. यापलीकडे जाऊन त्यांना स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी फार कमी मिळतो. पण, त्यातूनही हल्ली सोशल मीडियामुळे अनेक हौशी महिला आपल्यातील कला न घाबरता सादर करू लागल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला ‘सज धज के’, या हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. ग्रामीण भागातील हा महिलेचा डान्स एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असा आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Dipika Sarkar (@dipikasen557)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dipikasen557 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “काकू तुम्ही खरंच भारी नाचलात” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “सुंदर नाचलात.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खऱ्या कलाकार” आणखी एकाने लिहिलेय,, “एक नंबर डान्स”