Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका हळदीतील सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला अतिशय सुंदर डान्स करताना दिसतेय.

भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत, ज्या ‘सईया चुभुर चुभुर’ या भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या मुलीच्या हळदीमध्ये ‘सईया चुभुर चुभुर’ या भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Sangita Mishra (@sangeeta_mishra05)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत सात मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “काकू किती सुंदर डान्स केलात, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू तुम्ही कमाल”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू तुमची कंबर लचकेल, जरा हळू”