Viral Video: सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय.
समाज माध्यमांमुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.
नृत्य (डान्स ) ही कला आहे. ही कला जोपासावी लागते. प्रत्येक व्यक्ती तिला जमेल तसे डान्स करू शकते पण ज्यांना उत्तम डान्सर व्हायचे आहे असे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात आणि आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुंदर डान्स करत असून यावेळी त्या महिलेच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ती “तेरे इश्क में” या जुन्या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी ती करत असलेला डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @deep.ikayadav9408 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर एक लाखाहून अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “खूपच सुंदर नाचली“, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “काकू खूप भारी ”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काय एनर्जी आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काकू तुम्ही कमाल केली”.
