Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत, ज्या ‘तेरी आँखो का यो काजल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ‘तेरी आँखो का यो काजल’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतेय. यावेळी ती करत असलेला डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Prasenjit Jana (@prasenpiu_)

हेही वाचा
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा नाचलात पोरींनो …”

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @prasenpiu_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत आठ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर एक लाखाहून लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “काकू खरंच तुम्ही भारी नाचता.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “अहो काकू जरा हळू नाच”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काकू तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.”