Viral Video: समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या महिलेच्या डान्सने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
अनेक महिलांचे आयुष्य त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असते. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही महिला आवडीच्या गाण्यांवर डान्स करून डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. ही महिला या व्हिडीओमध्ये हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, ज्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका कार्यक्रमामध्ये “उई अम्मा” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा जबरदस्त डान्स पाहून आजबाजूला जमलेले लोक तिच्याकडे कौतुकाने पाहत आहेत आणि तिला प्रोत्साहन देत आहेत. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @deepali_saras या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चौदा मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर पाच लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “व्वा काकू खूपच छान नाचलात”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “ही तर रवीना टंडनच्या पोरीपेक्षा भारी”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “मी तुमची फॅन झाले आहे.”, तर एकाने लिहिलंय की, “फक्त जरा हळू नाचा”
