Viral Video: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण, थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत नृत्य म्हणजेच डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो. पूर्वी नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कार्यक्रमांसाठी केले जायचे. मात्र आता अनेकजण डान्सकडे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, शरीराचा व्यायाम होण्यासाठी शिवाय प्रसिद्धी आणि पैसा कमावण्याच्या दृष्टीकोनातूनही पाहत आहेत.

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एका महिलांच्या गृपचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये महिला अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत.

या महिलांनी जुनं हिंदी गाणं “हमको आज कल है इंतजार” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका महिलांचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दहा महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Neha’s Dance Zone (@nehas_dancezone)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nehas_dancezone या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “काकू खूपच भारी डान्स”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “सुंदर, अतिसुंदर नाचली ही”, तर आणखी एकानं लिहिलंय, “लयभारी डान्स.”