Viral Video: लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. महिला, मुली अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक महिला खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं घर, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला, एका कार्यक्रमात सुंदर लावणी करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला एका कार्यक्रमामध्ये साडी नेसून ‘चंद्रा’ गाण्यावर लावणी सादर करत आहे. तिच्या प्रत्येक स्टेप अन् चेहऱ्यावरील हावभाव तुमचेही लक्ष वेधून घेतील. सध्या तिचा हा लावणी डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by The_artof_rechal? (@rechal_salian)

@rechal_salian या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज अन् लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओ कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, की, “किती गं सुंदर नाचली” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात खरी लावणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम खूपच छा…जमलं मस्त” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.