auto driver Kind Gesture : प्रत्येक गोष्ट घडते तिच्या तीन बाजू असतात. एक चांगली, एक वाईट आणि तिसरी खरी जी क्वचितच कधी व्हिडीओ किंवा प्रत्यक्षदर्शीच्या माध्यमातून आपल्या समोर येते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणं आणि सत्य जाणून घेणे भरपूर महत्वाचे असते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये पहिल्यांदा बघताना तुम्हाला वाटेल रिक्षाचालक काहीतरी महिलेबरोबर चुकीचे करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण, खरं काहीतरी वेगळं आणि चांगलं असतं.

इन्स्टाग्राम युजर आणि तिचे काही मित्र ‘उबर’ (Uber) रिक्षातून प्रवास करत असताना त्यांचे लक्ष रिक्षाचालकाकडे गेले, जो स्कूटरवर बसलेल्या एका महिलेच्या बाजूने रिक्षा चालवत होता. ती महिला रस्त्यावरून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असते आणि रिक्षा चालक ‘तन्झिम’ एक पाय बाहेर काढून स्कूटरला टेकवतो, तर कधी स्कुटरला हळूच पुढे ढकलतो. रिक्षात बसणाऱ्यांना सुरुवातीला प्रश्न पडला होता की,त्यांचा चालक स्कूटरच्या इतक्या जवळून का चालवत आहे. पण, नीट बघितल्यावर त्यांना समजले की, त्या महिलेची गाडी बंद पडली होती.

रिक्षाचालक तिला गाडी पुढे नेण्यास मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या चालकाने सुमारे १० ते १५ मिनिटे त्या महिलेला मदत करणे सुरू ठेवले आणि स्कूटर चालू ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अखेरीस, तिला पुढील मदत मिळू शकेल अशा ठिकाणी पोहोचेपर्यंत तो तिच्या बाजूने रिक्षा चालवत राहिला. त्या क्षणी घडणाऱ्या गोष्टींमध्ये मग्न असल्यामुळे इन्स्टाग्राम युजरला या घटनेचा केवळ छोटासा भागच रेकॉर्ड करता आला. व्हिडीओचा वेग वाढवण्यात आला आहे (speed up केला आहे), त्यामुळे त्या महिलेच्या हालचाली असामान्यपणे जलद दिसू शकतात, जरी प्रत्यक्षात घटना तशी घडली नव्हती.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @chetnaaasaraf या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याने ‘उबर इंडिया’ला टॅग करून कॅप्शनमध्ये सविस्तर घटना लिहिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘तो एक जबाबदार नागरिक, चांगला वडील आणि माणूस आहे’, ‘माझ्या मनात पहिल्यांदा हाच विचार आला की, तो त्या मुलीला त्रास देत आहे. आजकाल आपली विचारसरणी किती बदलली आहे ना! पण, खरंच त्याचं कौतुक करायला हवं’, ‘क्षणभर मला वाटलं, हा माणूस तिचा पाठलाग का करत आहे… पण पुढच्याच क्षणी त्याचं कृत्य पाहून माझं मन भरून आलं. कृपया या माणसाला शोधा आणि त्याचा सन्मान करा’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.