Shocking video: काहीच दिवसांपूर्वी मुंबईतलं लालबाग अपघाताने हादरलं. बेस्टची बस अनियंत्रित झाली आणि लालबागमध्ये उत्सवाच्या रंगाचा बेरंग झाला. बेस्टचा अपघात झाल्याने ९ जण जखमी झाले. या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला. २८ वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधला मद्यधुंद प्रवासी कारण ठरला. मद्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद घालणाऱ्या प्रवाशाने बेस्ट बसचं स्टिअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने ९ जणांना उडवलं. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे, यामध्ये दोन तरुणांनी धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीय. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात सिटी बसमध्ये गुंडगिरी केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन तरुणांनी ड्रायव्हरला चालत्या बसमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मिल परिसरात दोन लोक चालत्या बसमध्ये चढले आणि त्यांनी चालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये बसलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या लोकांनी त्यांना धमकावले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे लोक ड्रायव्हरला मारहाण करत असताना कंडक्टर शांतपणे बघत राहिला, त्याने ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. आधी लालबाग आता भोपाळमध्ये घडलेल्या घटनेवरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशाप्रकारची गुंडगीरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा>> Shocking: तुम्हालाही व्हॅनिला आईस्क्रीम खायला आवडते का? २०२५ ची एक्सपायरी डेट, तरीही डब्यात काय आढळलं पाहा ही घटना मंगळवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. विवेक उधवानी असे ड्रायव्हरचे नाव असून हल्ला करणारे दोन्ही तरुण हे खासगी बसचे कर्मचारी आहेत. आरोपी दोघांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पण रेकॉर्डिंग आधीच सर्व्हरमध्ये सेव्ह होते. या घटनेनंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Sudhirsingh077 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.