रोलरब्लेडिंग करताना एक सर्कस कलाकार चुकला आणि तेव्हाचा एक भयानक क्षण कॅमेराने टिपला. जसं त्याला २० फूट उंचीवर लॅंड करण्यासाठी खाली ढकलले गेले तसं तो तिथे नीट पोहोचू शकला नाही. त्यामुळे पाय घसरला आणि उंचावरून खाली पडला. ड्यूसबर्ग, जर्मनी येथे ही घटना घडली जेव्हा व्यावसायिक स्केटर आणि कलाकार लुकाझ मालेव्स्की फ्लिक फ्लॅक सर्कसमध्ये स्टंट करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

कॅमेऱ्यात कैद झालेला अपघात दर्शवितो की लुकाझने चुकीच्या पद्धतीने धावत टेकऑफ केले आणि २० फूट खाली पडला कारण तो योग्य झेल घेऊ शकला नाही. त्यानंतर लँडिंग रॅम्पवर एक पाय ठेवताच तो खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर पडला. तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका कलाकाराने त्याला पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळेत तो तेथे पोहोचू शकला नाही. जेव्हा तो पडला तेव्हा त्याला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते, तो २० फूट उंचीवरून जमिनीवर पडला.

(हे ही वाचा: Viral Video: स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!)

(हे ही वाचा: एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral)

सुदैवाने, स्टंटमॅन लुकाझच्या हाताला फक्त फ्रॅक्चर झालं. लुकाझ मालेव्स्की यांनी डेली मेलला सांगितले की, ‘हे खूप वाईट असू शकते. माझ्या बरगड्या, नितंब आणि खांदे दुखत आहेत. मला गाडीने धडक दिल्यासारखे वाटले. पण मी ठीक आहे, मी जिवंत आहे.’ स्टंटमॅन जो अ‍ॅटकिन्सनही लुकाझसोबत परफॉर्म करत होता. त्याने सांगितले की जेव्हा लुकास पडला तेव्हा मला असे वाटले की एक स्फोट झाला आहे, तो पडताच एकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला पकडण्यात यश आले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video big mistake made while performing stunts in circus artist fell down from 20 feet height and ttg
First published on: 26-01-2022 at 15:34 IST