रंगांची होळी, लाठमार होळी, फुलांची होळी, मातीची होळी अशा अनेक प्रकारे लोक भारतात होळीचा सण साजरा करतात पण तुम्ही कधी चप्पलमार होळीबद्दल ऐकले आहे का? पाटणामधील वॉटर पार्कमध्ये चप्पलमार होळी खेळली गेली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संपतचक परिसरात असलेल्या वॉटर पार्कमध्ये आयोजित होळी मिलन कार्यक्रमादरम्यान लोक कारंज्याचा आनंद लुटत होते. त्याचवेळी काही मुद्द्यावरून दोन गटात वाद झाला. मग काय चप्पलमार होळी सुरु झाली आणि बघता बघता परिस्थिती भयानक होऊ लागली.

mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
How to make Cheese Thalipeeth recipe in Marathi
गरमा गरम चविष्ट चीज थालीपीठ खा अन् जीभेचे चोचले पुरवा! ही घ्या रेसिपी

आयोजकांनी केला हवेत गोळीबार

परिस्थिती इतकी बिकट झाली की, कार्यक्रमाच्या आयोजकांना वारंवार घोषणा द्याव्या लागल्या, मात्र कोणीही ते मानायला तयार नव्हते. यानंतर आयोजकांना हवेत गोळीबार करावा लागला असे समजते. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आणता आली. यावेळी, लहान मुले व महिला कसेतरी सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी ठरले.

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: “ह्या वर्षीपासून नवा बाल्या डान्स…” कुशल बद्रिकेने हटके स्टाइलने साजरी केली होळी!)

‘चप्पलमार होळी’ खेळताना लोक एकमेकांना लक्ष्य करत असताना सर्वत्र चप्पल उडताना दिसली. डझनभर चप्पल हवेत उंच आणि पाण्यात तरंगताना दिसत होत्या. या व्हिडिओला आतापर्यंत ३८,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.