birthday boy party viral video : अभ्यास, प्रोजेक्ट्स, ऑफिसचे काम या नेहमीच्या दिनक्रमामधून वेळ काढून एकमेकांना भेटण्यासाठी तरुणाई विविध फंडे शोधण्याच्या नेहमीच प्रयत्नात असते. मग त्यामध्ये सकाळी जुहूला जाऊन क्रिकेट खेळणं असो, संध्याकाळी स्कुटीवरून राउंड मारणं असो किंवा ग्रुपमधल्या एखाद्या मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस. हा दिवस येण्याच्या काही दिवस आधीपासून सुरु झालेली धम्माल वाढदिवसाची खरी मजा असते. यानंतर केक कापून पार्टी आवर्जून केली जाते. पण, सोशल मीडियावरील झारखंडमधील एका चिमुकल्याच्या वाढदिवसाच्या पार्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
झारखंडमधील एका लहान मुलाचा साधासा वाढदिवस अगदी सगळ्यांसाठी सोहळा ठरला. कारण होतं त्याने दिलेली अनोखी पार्टी, ज्यात मॅगी, फँटाची बाटलीचा समावेश होता आणि या पार्टीचा आनंद घेण्यासाठी शेगडीभोवती उत्साही मुलांचा ग्रुपही दिसत होता. बर्थडे बॉय सूरज एका छोट्या स्टोव्हवर मॅगी नूडल्स शिजवत हसताना दिसला; तर जवळच काही मुले वाढदिवसाच्या मेजवानीची वाट पाहत उभी होती.या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर, हजारो युजर्सनी सोशल मीडियावर सूरजसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला; तर अनेकांनी तर त्याला युपीआय द्वारे पैसे पाठवण्याची तयारीही दर्शवली.
रीलची सुरुवात सूरजच्या एका मित्राने आनंदाने साजरा होणाऱ्या वाढदिवसाची ओळख करून देत केली. तो व्हिडीओमध्ये म्हणाला, “हॅलो मित्रांनो, आज सूरजचा वाढदिवस आहे. तो १०० रुपयांची मॅगी आणि फँटा घेऊन आला आहे. इथे खूप सारी मुलंही आहेत आणि तो आज आम्हाला पार्टी देणार आहे.”
साधेपणाने केलेली ही मांडणी असूनही, त्या प्रसंगातील जिव्हाळ्यानेच सोशल मीडिया युजर्सची मने जिंकली. या ‘रील’ला आतापर्यंत जवळपास ३० लाख (३ दशलक्ष) व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @surajkaju10k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून काही युजर्स “मला का बोलावलं नाही पार्टीला”, “तुझं स्कॅनर दे काही तरी छानसं पाठवतो तुझ्यासाठी”, “तुझ्या सारखा मित्र सगळ्यांना मिळो”, “तर काही ताटाची इमोजी पाठवून मॅगी खाण्यास उत्सुक दिसत आहेत”, तर अनेक जण सूरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आले आहेत; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
