Viral Video: हल्लीची लहान मुलेही नृत्यकलेत मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतात. सोशल मीडियावरील लोकप्रिय गाणी आणि डान्स ट्रेंड्स पाहून अनेक चिमुकले आत्मविश्वासाने नृत्य सादर करतात. त्यांच्या निरागस हावभाव, उत्साही सादरीकरण आणि आकर्षक स्टेप्समुळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यामुळे लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यास मदत होत असून त्यांच्या आत्मविश्वासात आणि सर्जनशीलतेतही भर पडते.
नृत्य हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो एक प्रभावी व्यायामही आहे. नियमित डान्स केल्याने संपूर्ण शरीराची हालचाल होत असल्याने कॅलरी बर्न होण्यास, स्नायू बळकट होण्यास आणि शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. याशिवाय डान्समुळे एंडॉर्फिनसारखी ‘फील-गुड’ हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे मन प्रसन्न राहते, तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आनंदी आणि उत्साही राहण्यासाठीही नृत्य हा उत्तम पर्याय मानला जातो.
पावसाळा सुरू होताच सोशल मीडियावर पावसात डान्स करणाऱ्या तरुण-तरुणींचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागतात. भरपावसात आवडत्या गाण्यांवर नृत्य करत पावसाचा आनंद लुटणारे अनेक रील्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. निसर्गरम्य वातावरण, पावसाचे थेंब आणि उत्साही नृत्य यांचा सुंदर मिलाफ असल्याने अशा व्हिडीओंना लाखो व्ह्यूज, लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. त्यामुळे पावसात डान्स करणारे व्हिडीओ हा प्रत्येक पावसाळ्यातील सोशल मीडियावरील लोकप्रिय ट्रेंड ठरत आहे.
पावसाच्या रिमझिम सरींमध्ये एक चिमुकला मनसोक्त भिजत “बुलाए रुनझुन रुनझुन करती पायल” या गाण्यावर निरागसपणे थिरकताना दिसतोय, त्याच्या या मनमोहक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकत असून, पावसातील बालपणाच्या सुंदर आठवणी पुन्हा एकदा ताज्या करत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @riyan_mipi या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा तू तर लयभारी” एका युजरने लिहिलेय, “काय भारी नाचतोय हा” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती गोड”
