Viral Video: समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील काही जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहेत.
बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका वस्तीमधील काही मुलींचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात त्या खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.
हल्ली लहान मुलांमध्येही डान्सची आवड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे त्यांना विविध गाणी आणि डान्सच्या स्टेप्स सहज पाहता येतात. अनेक मुलं लोकप्रिय बॉलिवूड आणि मराठी गाण्यांवर भन्नाट डान्स करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांच्या निरागस अंदाजातील डान्सला नेटकऱ्यांकडूनही भरभरून पसंती मिळताना दिसते.
हल्ली फक्त मुलीच नाही तर मुलंही डान्समध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय गाण्यांवर भन्नाट स्टेप्स करताना लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि डान्स करण्याची अनोखी शैली नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, या चिमुकल्यांच्या डान्स व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा बर्थडे पार्टीमध्ये ‘इश्क गली में सैकड़ों’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर तो आत्मविश्वासाने डान्सच्या स्टेप्स करत असून, त्याचा उत्साही अंदाज उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. चिमुकल्याचा हा मजेशीर डान्स सोशल मीडियावरही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pkuphar01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “काय नाचला रे हा”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “किती छान भावा”; तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच भारी डान्स केला भावाने.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लयभारी गं”
