viral video boy effortlessly throws newspapers toward homes : बिल्डिंग असो, चाळ असो किंवा अगदी बंगला आजही अनेक ठिकाणी सकाळची सुरुवात ही पेपरवाल्याच्या खडखडाटानं होते. प्रत्येक घरामध्ये जगातल्या काना-कोपर्‍यातील बातमी पोहोचवण्याची जबाबदारी या वृत्तपत्र विक्रेत्यांवर असायची, आता हे चित्र काही प्रमाणात कमी झालं आहे, मात्र आजही पेपरवाले दादा पाहाटेच आपल्या सायकलवर वृत्तपत्राचा गठ्ठा टाकून, ठरलेल्या परिसरात घराघरांमध्ये पेपर टाकण्याचं काम करतात. त्यांच्यामुळेच आपण आजही सकाळी चहासोबत पेपर वाचण्याचा आनंद घेतो.

तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये ‘पेपर बॉय दीप’ असे नाव असणाऱ्या तरुणाची पेपर टाकण्याची स्टाईल व्हायरल होते आहे. तो अगदी सहज वर्तमानपत्रे घरांमध्ये अचूकपणे फेकतो. सायकलवरून न उतरता, अचूक नेम लावून कधी दाराखालील अरुंद फटीतून, तर कधी वाट पाहणाऱ्यांच्या हातात, तर कधी हातात उत्तम प्रकारे उडवून थेट घरांमध्ये पोहचवताना दिसत आहे. अशाप्रकारे प्रत्येक छोट्या व्हिडीओमध्ये डिलिव्हरीचा वेगळा क्षण दाखवला आहे.

“हे काम प्रत्येकाला जमतं नाही” (Viral Video)

फक्त वेग आणि अचूकता नाही, तर काम करताना दिसणारा नियंत्रण आणि सातत्यही दिसते. त्यामुळे लोकांना हे व्हिडीओ पाहून आश्चर्य आणि कौतुक दोन्ही वाटले. काही व्हिडीओ डिलिव्हरी करणारा मुलगा लांबून दुमडलेले वर्तमानपत्र थेट घरात फेकताना दिसतो. तर काही वर्तमानपत्र जमिनीवरून अगदी सुरळीत घसरत जाऊन थेट दाराजवळ थांबतानाही दिसतात. इतर काही व्हिडीओमध्ये तो इतक्या अचूक वेळेत वर्तमानपत्र फेकतो की, घरातून बाहेर येणारे लोक चालता चालता हवेतच ते वर्तमानपत्र सहज पकडतात.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @paper_boy_deep या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “उडती उडती खबर आली आहे”, “जेवढं चांगला वर्तमानपत्र फेकलं जातंय, तितकंच चांगलं ग्राहकही पकडताना दिसत आहेत”, “खूप जबरदस्त टॅलेंट आहे”, “जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे”, “हे काम प्रत्येकाला जमतं नाही” ,”ऑलिम्पिकमध्ये जायला हवंस तू”, “डिस्कस थ्रो खेळात गोल्ड मेडल नक्की भेटेल तुला” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…