rapido driver viral video : लग्नासाठी जोडीदार शोधणे फार कठीण असतं असं म्हणतात. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली की, ती घरच्यांना आवडत नाही अशा अनेक समस्या समोर येऊन उभ्या राहतात. अशातच अनेक जण नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा अगदी दिसण्यावरूनही एकमेकांना नकार देतात. मग अशावेळी फक्त आणि फक्त स्वतःबद्दल वाईट वाटते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये रॅपिडो चालवतो म्हणून एका मुलाला नकार देण्यात आला आहे.
“कोणतंही काम मोठं किंवा लहान नसतं…” हा संवाद तुम्ही नऊ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान अभिनीत “रईस” चित्रपटात ऐकला असेलच. पण प्रत्यक्षात असे संवाद फक्त चित्रपटांपुरते मर्यादित असतात. रॅपिडो चालकाने शेअर केलेली गोष्ट तुम्हाला पटवून देईल की शेवटी, तुम्ही जे काम करता तेच सर्वात महत्त्वाचे असते.
आजही, जेव्हा पालक आपल्या मुलीसाठी जोडीदार शोधतात तेव्हा ते ५०,००० रुपये कमावणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांपेक्षा २५,००० रुपये कमावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात. जॉब सिक्युरिटी हे याचं प्रमुख कारण आहे. पण, जर एखाद्या व्यक्तीला रॅपिडो चालवल्यामुळे वारंवार मुलीकडून नकार दिला जात असेल. तर त्याचे निराश होणे योग्य आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओमध्ये दिल्लीतील स्पायडरमॅन @om_spidey म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका इन्स्टाग्राम युजरने ३० वर्षांचा असून त्याला दोन ते तीन वेळा लग्नाचे प्रस्ताव आले आहेत. पण मुलगा रॅपिडो चालवतो हे ऐकल्यानंतर लग्नाची गोष्ट पुढे गेली नाही. त्याचा महिन्याचा पगार सुद्धा ३० ते ४० हजार आहे. तरीही, “मुलीचे लग्न रॅपिडो ड्रायव्हरशी होणे शक्य नाही” असं मुलीकडचे सहज म्हणून जातात.
रॅपिडो चालवणे हे खरोखर सुरक्षित काम नाही. यामध्ये तुम्हाला फक्त प्रवाशांना सुखरूप पोहचवण्यासाठीचे पैसे मिळतात. सुट्टी नसते. अशा परिस्थितीत, कोणताही वडील आपल्या मुलीसाठी स्थिर उत्पन्न असलेल्या मुलगाच शोधेल. त्यामुळे आता त्याच्या कुटुंबाने त्याला नोकरी शोधण्याचा आग्रही केला आहे. म्हणून, तो ड्रायव्हिंग सोडत आहे हे सांगत त्याने हा व्हिडीओ बनवला आहे.
रॅपिडो चालवण्याबरोबरच तो ब्लॉग सुद्धा करतो. यामुळे त्याचे “दिल्लीज स्पायडरमॅन” असे इन्स्टाग्राम हँडल सुद्धा सुरु केले. सध्या त्याचे १५,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. पण आता तो रॅपिडो चालवत नसल्याने तो ब्लॉगही करू शकणार नाही. तो माणूस त्याच्या जवळजवळ दोन मिनिटांच्या व्हिडीओ शेवट या विधानाने करतो.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @om_spidey या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून मजेशीर तर काही जण भावूक प्रतिक्रिया देताना दिसले आहेत. काही जण “आत्ता रॅपिडोचा जॉब सोड आणि लग्नानंतर पुन्हा नोकरीवर रुजू हो”, “एक-दोन जणी नाही म्हणाल्या तर काय झालं; तू तुझ्या पैसे कमवण्याकडे लक्ष दे”, “तू रॅपिडो चालवणाऱ्या मुलीशी लग्न कर” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…

