Viral Video: सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या विविध भाषांमधील गाणी मोठ्या प्रमाणात चर्चेत येताना दिसतात. एखादं गाणं लोकप्रिय झालं की त्यावर अनेकजण डान्स, अभिनय किंवा आपल्या हटके अंदाजातील रिल्स तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, पंजाबी, दक्षिण भारतीय भाषांपासून ते परदेशी भाषांमधील गाण्यांवरही नेटकरी उत्स्फूर्तपणे रिल्स बनवताना दिसतात. त्यामुळे काही गाणी क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यातील स्टेप्स, हावभाव किंवा हटके अंदाजाचीही जोरदार चर्चा सुरू होते.
हल्ली सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फक्त तरुणीच नाही, तर तरुण मंडळीही मित्रमंडळी एकत्र आली की मजामस्ती म्हणून विविध गाण्यांवर रिल्स बनवताना दिसतात. ट्रेंडिंग गाणे, मजेशीर डायलॉग किंवा हटके स्टेप्स यावर मित्रांचा ग्रुप एकत्र येऊन व्हिडीओ शूट करतो आणि तो सोशल मीडियावर शेअर करतो. अशा व्हिडीओंमध्ये मित्रांमधील धमाल, उत्साह आणि भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळते. त्यामुळे अनेकदा साध्या मजामस्तीच्या क्षणांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या गाण्यांमध्ये ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ या लोकप्रिय चित्रपटातून हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्याला अरुण पौडवाल यांनी संगीत दिले असून गीतकार शांताराम नांदगावकर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. विशेष म्हणजे सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंह, सचिन पिळगांवकर आणि अपर्णा मयेकर अशा अनेक गायकांच्या आवाजाने हे गाणे सजले आहे. चित्रपटातील चार जोड्यांवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात प्रेम, आनंद आणि उत्साहाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.
सध्या सोशल मीडियावर ‘हृदयी वसंत फुलताना’ या लोकप्रिय मराठी गाण्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या गाण्यावर अनेकजण डान्स, अभिनय आणि आपल्या हटके अंदाजात रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. विशेष म्हणजे जुन्या काळातील हे गाणे नव्या पिढीलाही आवडत असल्याचे या रिल्समधून दिसून येते. त्यामुळे गाण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत असून, त्यावरील अनेक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सध्या याच गाण्यावर काही तरुणांनी फार्म हाऊसवर फिरायला गेल्यानंतर भन्नाट डान्स केला आहे. मित्रांचा ग्रुप एकत्र येताच त्यांनी या सदाबहार गाण्यावर ठेका धरत आपली मजामस्ती कॅमेऱ्यात कैद केली. त्यांचा उत्साही अंदाज आणि डान्स पाहून हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @digambar_c_pawar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “मुलींना ही येत नाही एवढं छान… व्वा सुरेख हो” आणखी एकाने लिहिलेय, “खूप सुंदर भावांनो” आणखी एकाने लिहिलेय, “जाम भारी बोल… माझ्या दोस्तांनो…. आपल्याला जाम आवरला”
