उत्तर प्रदेशातील आग्रा येथे दलदलीत अडकलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीला एका पोलीस हवालदाराने आपला जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धाडसी बचाव मोहिमेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, लोक त्या पोलिसाचे कौतुक करत आहेत. शुक्रवारी दुपारी एतमादपूर येथील रेल्वे स्थानकाजवळ दलदलीत एक व्यक्ती अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ब्रजेश कुमार असे त्याचे नाव असून आणि तो माणूस दलदलीत इतका फसला होता की त्याचा तिथून हलता सुद्धा येत नव्हतं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दलदलीत किती फसलेला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस हवालदार संदेश कुमार यांनी कमरेला दोरी बांधून दलदलीत प्रवेश केला. यात त्यांच्या जीवाला धोका असून सुद्धा त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. दलदलीत जाऊन संदेश कुमारने त्या माणसाला पकडले आणि इतर पोलिसांनी त्याला दोरीने खेचून त्या दोघांना दलदलीच्या बाहेर आणलं. त्याची सुटका केल्यानंतर उपचारासाठी त्याला ताबडतोब एतमादपूर येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले.

आणखी वाचा : Bill Gates Resume: बिल गेट्स यांनी ४८ वर्षांपूर्वीचा जुना बायोडाटा केला शेअर, नोकरी मिळवण्यासाठी पाहा काय लिहिलं?

यूपी पोलिसांनी ट्विट करत या बचाव मोहिमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. “दलदलीत अडकलेल्या वृद्धाला वाचवण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा वापर करून त्यांना वाचवणारे कॉन्स्टेबल संदेश कुमार आणि @agrapolice PS बरहानच्या टीमच्या धाडसी प्रयत्नांना सलाम.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

आणखी वाचा : हा VIRAL VIDEO तुम्हाला बालपणीच्या आठवणीत घेऊन जाईल, एकाच छत्रीत मित्रांना एकत्र बघून तुम्हीही भारावून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : देसी ढोलाच्या तालावर थिरकले विदेशी नागरिक, जबरदस्त डान्सचा हा VIRAL VIDEO पाहा

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आग्रा झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजीव कृष्णा यांनी कॉन्स्टेबल संदेश कुमारच्या धाडसी प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल बक्षीस जाहीर केले. लोक हा व्हिडीओ पाहून पोलिस हवालदार संदेश कुमार यांच्या धाडसाचं कौतुक करत वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण या पोलिस हवालदाला सलाम ठोकत आहेत.