viral video bride dance in haldi ceremony : आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक म्हणजे लग्न. प्रत्येकजण या दिवसाची फार आतुरतेने वाट पाहत असतो. यादिवशी आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होणार असते. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज जोडीदार चांगला असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती म्हणा किंवा चिंता आपल्या मनात नसते. मग नवरी मुलगीही तिचं माहेर सोडून अगदी आनंदाने जायला तयार असते आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी प्रकर्षाने दिसून येतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये नवरी मुलीचा डान्स व्हायरल होतो आहे.

लग्नाआधी साखरपुडा हळद असे कार्यक्रम पार पडतात. तर तृप्ती नावाच्या नवरीने ‘नखरेवाली’ या गाण्यावर तिच्या हळदीत जबरदस्त डान्स केलेला दिसतो आहे. “नको मला गाडी, गावातली माडी, गळ्यात एक डोरलं पाहिजे मला” गाण्याचे बोल सुरु होतात आणि नवरी मुलगी अगदी त्या शब्दांना जुळतील असे हुबेहूब डान्स स्टेप्स आणि हावभाव देताना दिसत आहे; जे पाहून तुमची खरंच नजर हटणार नाही. एवढंच नाही तर तुम्ही हा डान्स व्हिडीओ अगदी पुन्हा पुन्हा बघाल.

ध्या आपल्याकडे लग्नसराई सुरु आहेत त्यामुळे हळदीत नाचताना ,वरातीत नाचतानाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी बरेचसे व्हिडीओ हे खूप गमतीशीर आणि पोट धरून हसायला लावणारे असतात. तर काहींना पाहून आपले पाय सुद्धा थिरकायला सुरु होतात.कारण – प्रत्येकाला डान्सची ओढ असते. कोण आनंद व्यक्त करण्यासाठी तर कोण आपल्या भावना मांडत डान्सचे सादरीकरण करत असतो. पण, या नवरीचा डान्स खरोखरच कौतुकास्पद आहे. गाडी, बंगला नको एखादा समजूतदार नवरा हवा अशी मागणी ती डान्सद्वारे व्हिडीओत करताना दिसते आहे. एकदा बघाच नवरीचा हा जबरदस्त डान्स…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kru.tikka_masala या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा या खास डान्सचे कौतुक करत आहेत. कोणी हार्ट ईमोजी वापरून त्यांच्या भावना मांडताना तर कोणी “आणि हा रील व्हायरल गेलाच पाहिजे” कमेंटमध्ये अगदी आवर्जून म्हणताना दिसून आले आहेत. तुम्हाला नवरीचा डान्स कसा वाटला एकदा व्हायरल व्हिडीओतून पाहून आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.