Viral Video: लग्न आणि साखरपुडा हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अतिशय सुंदर आणि खास क्षण असतात. या दिवसांची प्रत्येक मुलगी अनेक स्वप्नं पाहत असते. साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचे सर्व विधी, सुंदर कपडे, दागिने, कुटुंबीयांची लगबग आणि जवळच्या माणसांसोबत केलेली धमाल या आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवल्या जातात. विशेष म्हणजे, आजकाल या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. नवरीचा सुंदर लूक, तिची एंट्री, भावनिक निरोप किंवा मैत्रिणींसोबत केलेला डान्स असे अनेक क्षण नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे लग्न आणि साखरपुड्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि त्यातील हटके क्षणांची सर्वत्र चर्चा रंगते.
लग्नसोहळा म्हटलं की आनंद, उत्साह, नाचगाणं आणि धमाल आलीच! हल्ली लग्नातील अनेक मजेशीर आणि हटके क्षण सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नवरा-नवरीचा डान्स, मित्रमंडळींची मस्ती, नातेवाईकांचे भन्नाट डान्स परफॉर्मन्स, तर कधी लग्नात घडणारे अनपेक्षित प्रसंग नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. मोबाईलमध्ये कैद झालेले हे क्षण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. काही व्हिडीओ इतके लोकप्रिय होतात की, त्यातील व्यक्तीही रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतात. त्यामुळे लग्नसोहळ्यातील व्हिडीओंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगताना दिसते.
सध्या सोशल मीडियावर लग्न आणि साखरपुड्यातील डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. नवरा-नवरी आपल्या आयुष्यातील खास दिवस आणखी अविस्मरणीय करण्यासाठी हटके डान्स परफॉर्मन्स सादर करताना दिसतात. अशातच एका साखरपुड्यातील व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये होणारी नवरी ‘ऐका दाजीबा’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर ठेका धरत नवरीने आपल्या डान्समधून आनंद व्यक्त केला आहे. साखरपुड्यासारख्या खास प्रसंगी नवरीचा हा डान्स पाहून उपस्थितांचाही उत्साह वाढल्याचे दिसते. सोशल मीडियावर अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळते, कारण त्यामध्ये आनंद, प्रेम आणि आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात पाहायला मिळते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ruii.muvzz या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर”, एका युजरने लिहिलेय, “मस्त डान्स ताई.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई जबरदस्तच”
