Dance Video: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. यात नवरा नवरीसह संपूर्ण कुटूंब, मित्र-मंडळी डान्स करतात मजा करतात. लग्न होऊन सासरी जाणारी नवरीदेखील अगदी या समारंभामध्ये मनसोक्त नाचते. हे सगळे कार्यक्रम नवरीसाठी अगदी खास असतात.
सोशल मीडियावर लग्नसमारंभातील असे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यात मेहंदीतील नवरीच्या डान्सचे व्हिडीओ याआधी तुम्ही पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात मेंहदीच्या कार्यक्रमात नवरी जबरदस्त डान्स करताना दिसतेय.
नवरीचा डान्स व्हायरल (Bride Dance Viral Video)
लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मेहंदी समारंभात नवरी अगदी बेभान होऊन डान्स करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हातावर मेहंदी काढून नवरी जबरदस्त डान्स करत एन्जॉय करताना दिसतेय. डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरदेखील खूप आनंद दिसतोय. मेहंदीच्या या कार्यक्रमाची शोभा तिने वाढवल्याचं या व्हिडीओत दिसतंय. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी या नवरीचं कौतुक केलंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @_godvi_ इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला असून “मित्रांनो ही नवरी आहे” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
नवरीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मस्त अशीच हसत नाचत राहा”, तर दुसऱ्याने “असं वाटतंय नवरी खूप मस्त डान्सर आहे” अशी कमेंट केली; तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आवडत्या मुलासोबत लग्न होत असेल”
