सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू आहे. लग्नातील धमाल, मजा यांचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. प्री वेडिंग फोटोशूटपासून लग्नातील एन्ट्रीपर्यंत अनेक भन्नाट कल्पना वापरल्याचे तुम्ही पाहिले असेल. असाच एका लग्नातील अनोख्या एन्ट्रीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. यामागचे कारण काय जाणून घ्या.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आयुष्याच्या जोडीदारासोबत बंधनात अडकण्याचा पवित्र सोहळा साजरा केला जातो. पण हा दिवस म्हणजे आपल्याकडे किती संपत्ती आहे हे दाखवण्याची स्पर्धा असल्यासारखे आयोजन आजकाल केले जाते. कोण सर्वात जास्त हटके आणि खर्चिक आयोजन करते याची चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते असेच काहीसे सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
viral video of youtuber enjoying street massage
Video : अमेरिकन यूट्युबरला पडली भारतीय ‘मसाज’ची भुरळ! “याला कामावर घ्या…” चक्क इलॉन मस्ककडे केली मागणी
cab driver behind the cab wrote quotes on that the boys become emotional after reading it watch viral video
कॅब ड्रायव्हरने गाडीवर लिहिले असं काही की PHOTO पाहून युजर्स म्हणाले, “मुलांच्या वेदना कोणी…”

आणखी वाचा: महिलेचं बेसूर गाणं ऐकताच कुत्र्याने केले असे काही की…; Video पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

या व्हिडीओमध्ये एक नवरी वडिलांसह एका भव्य झुंबरमधून एन्ट्री घेत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये हा झुंबर इलेक्ट्रॉनिक असून तो पुढे सरकत स्टेजपर्यंत येत असल्याचे दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहा नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

आणखी वाचा: चक्क चिप्सच्या पाकीटात बनवले ऑम्लेट! Viral Video वर नेटकऱ्यांनी नाराजी का व्यक्ती केली एकदा पाहाच

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आणखी वाचा: हे प्राणी आहेत की माणसं? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video

जर चुकून काही तांत्रिक बिघाड झाला आणि झुंबर कोसळला तर खाली उभ्या असणाऱ्या व्यक्तींना दुखापत होऊ शकते, कदाचित त्यांचा जीवही जाऊ शकतो अशी चिंता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीचा दिखावा करण्याची सवय सर्वांना लागली आहे, त्यामुळे असे भव्य प्रदर्शन चुकीचे असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले.