Viral Video: सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. परंतु यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेत येतात. अनेकदा चर्चेत आलेल्या व्हिडीओमधील कलाकरांना यामुळे खूप प्रसिद्धी मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील एक नववधू खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

लग्न असो किंवा साखरपुडा हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील आणि साखपुड्यातील काही हटके व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिले असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या मेहंदी सोहळ्यात वधू हातावर मेहंदी काढल्यानंतर “मैं तो अपने साजन के द्वार चली रे” या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिच्या सुंदर डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shweta_mhasade या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘नवरी खूप हौशी आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘नवरी खरंच खूप उत्साही आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘तिच्या आयुष्यातील सुंदर क्षण’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘जबरदस्त डान्स.’