विवाह हा प्रत्येक वधू-वराच्या आयुष्यातील आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. या दिवसापासून वधू-वर आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतात. यामुळे आपलं लग्न अगदी दणक्यात, थाटामाटात झालं पाहिजे असे प्रत्येक वधू-वराला वाटत असते. लग्नातील मेहंदी कार्यक्रम, हळद ते कपड्यांची खरेदीपर्यंत सर्व गोष्टी आनंदाने, आवडीने केल्या जातात. पण क्वचितच अशी लग्न असतात जिथे पैसे वाचवण्यासाठी पाहुण्यांना साग्रसंगीत जेवण नाही पण चांगलं आदरातिथ्य तरी केलं जात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल अशा एका लग्नाची गोष्ट व्हायरल होत आहे, जिथे साग्रसंगीत जेवण तर सोडाच पण पाहुण्यांचा पाहुणचारही धड नीट केलेला नाही. त्यामुळे या कंजूष वधू-वराचं लग्न आता चांगलचं चर्चेत आलं आहे.
लग्नात आलेले पाहुणे वधू-वराने केलेला आदरातिथ्य पाहून चांगलेच संतापले, खरं तर पाहुण्यांना अपेक्षा होती की, लग्नात आल्यानंतर त्यांना अगदी आदरातिथ्याने वागवले जाईल आणि त्यांना खाण्यापिण्यासाठी स्वादिष्ट पदार्थ दिले जातील. पण तसे काही झाले नाही. पाहुणे लग्नात पोहोचले तेव्हा त्यांना फक्त पाणी दिले गेले. वधू-वराने लग्नात केलेला हा कंजूषपणा पाहुन पाहुणे चांगलेच भडकले.
Reddit वर या लग्नाची एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात असे सांगण्यात आले आहे की, वधूने स्वत: पाहुणचाराच्या नावाखाली तिच्या लग्नात आमंत्रित पाहुण्यांना फक्त पाणी दिले. सहसा लोक वेगळ्या प्रकारच्या कल्पना घेऊन लग्नात येतात, पण या लग्नातील पाहुणचार पाहता एका पाहुण्यानेच शेअर केले की, या जोडप्याच्या या वागण्याने तो खूपच आश्चर्यचकित झाला आहे.
Reddit च्या पोस्टमध्ये वधूचा हवाला देत सांगण्यात आले आहे की, ही वधू केवळ पाणी पिते. कधी कधी ती ज्यूस आणि दूधही पिते. ती सहसा कॉफी देखील पित नाही. यामुळेच तिने आपल्या लग्नात लोकांना फक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय जेव्हा तिने पाहुण्यांना सांगितला जेव्हा अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंदचं निघून गेला होता. यावर नववधूने असेही म्हटले की, काही लोकांना हे पटले नाही तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली.
काही पाहुण्यांना ‘ओपन बार’ची होती अपेक्षा
यातील काही पाहुण्यांनी या जोडप्याला ‘ओपन बार’ची सुविधा ठेवा असे सुचवले होते, जेणेकरून पाहुणे आवडीचे ड्रिंक्स तरी पिऊन जातील, पण वधूने या कल्पनेला विरोध केला. यावर वधूने असे उत्तर दिले की, आम्ही तसे करु शकत होतो, परंतु बारटेंडरचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही फक्त पाणी देण्याचा निर्णय घेत आहोत.
ही पोस्ट सध्या Reddit वर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्सना वधू-वराची ही कृती अतिशय वेडसर वाटत असल्याचे म्हटले. त्याचवेळी बहुतेक युजर्सनी म्हटले की, लग्नासाठी भेटवस्तू घेऊन आलेल्या पाहुण्यांना केवळ पाणी देणे चुकीचे आहे. पण काही युजर्सनी या जोडप्याच्या कृतीचे समर्थन केले आहे.