Viral Video: खऱ्या प्रेमामध्ये दोघांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना, आकर्षण व आपलेपणा यांसारख्या अनेक गोष्टी दडलेल्या असतात. आतापर्यंत आपण अशा अनेक खऱ्या प्रेमी जोडप्यांच्या अजरामर कथा ऐकत किंवा वाचत आलो आहोत. परंतु, मागील काही वर्षांपासून प्रेमाची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली आहे. साधा विचार करायचा झाला तरी एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात, मुलं जन्माला घालतात हेच चित्र नजरेसमोर येते. नव्हे, जगाची हीच रीत पूर्वीपासून चालत आलेली आहे. मात्र, मागच्या काही वर्षांमध्ये स्वलिंगी लोकांकडेच आकर्षित होणाऱ्या अनेक तरुण-तरुणींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संदर्भातील अनेक बातम्या, अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. आताही याच विषयासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

असं म्हणतात की, दोन खरं प्रेम करणाऱ्यांना कुटुंब, समाज, रूढी, परंपरा कोणीही अडवू शकत नाही. खरं प्रेम धर्म, जात, वय, रंग, परिस्थिती व लिंग या सर्व गोष्टींच्या पलीकडे मानले जाते. स्वलिंगीय लोकांकडे आकर्षित होणाऱ्या तरुण-तरुणींच्या प्रेम आणि त्यांच्या लग्नाला सुरुवातीला विरोध करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडीओतही असंच काहीसं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या आलिशान हॉलमध्ये तरुणीचा साखरपुडा होत आहे. त्यावेळी एक तरुणी तिथे येते आणि स्टेजवर बसलेल्या वधूला जाब विचारयला सुरुवात करते. यावेळी वधू तिला समजावण्यासाठी तिच्याजवळ जाते. पण, ती वधूला दूर ढकलते आणि पुन्हा जाब विचारते. यावेळी वधूचा होणारा नवऱ्यालाही शॉक बसतो. त्यानंतर वधू तिला रूममध्ये नेते आणि शांत करते. साखरपुड्यात अचानक आलेली ही तरुणी लेस्बियन असून, ती वधूची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @life_lessons_unfold या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत २२ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकानं लिहिलंय, “बापरे हा काय प्रकार”. तर दुसऱ्यानं लिहिलंय, “वधूलाच त्या मुलीबरोबर राहायचं नसेल”. तर तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “मला आता समाजात राहायची भीती वाटतेय”. तर आणखी एका युजरनं लिहिलंय, “बरं झालं तिच्या नवऱ्याला कळलं”.