Viral Video: एका महापौरांना नवीन पुलाच्या उद्घाटनावेळी पेचप्रसंगाचा सामना करावा लागला. त्यामुळे सुमारे २० जण खोल दरीत कोसळले. वृत्तानुसार, आठ जण जखमी झाले असून काहींची हाडे मोडली आहेत. स्थानिक शहर सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की चार नगर परिषद सदस्य आणि दोन शहर अधिकारी आणि एक स्थानिक पत्रकार जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना मेक्सिको सिटीमधील आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मोठ्या संख्येने लोक पुलावर येत आहेत. हळू हळू पूल हलू लागतो आणि काही क्षणात पूलाचा काही भाग कोसळतो. स्थानिक वृत्तानुसार, महापौरांच्या पत्नीसह लोक १० फूट खोलवर पडले.

हा लटकणारा पूल लाकडी बोर्ड आणि धातूच्या साखळ्यांनी बनलेला होता आणि नुकताच तो पुन्हा बांधण्यात आला. स्थानिक बातम्यांनुसार, महापौर जोस लुई म्हणाले की उद्घाटनापूर्वी काही लोक त्यावर उड्या मारत होते. जास्त अधिकारी आणि पत्रकारांच्या उपस्थितीमुळे पुलाची क्षमता ओलांडली गेली असावी.

maharashtra cabinet approves four member ward in municipal corporations except mumbai
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; मुंबईखेरीज सर्व महापालिकांमध्ये अंमलबजावणी, पुन्हा चार सदस्यीय प्रभाग
bjp candidate for lok sabha election in pune will be decided by party workers
पुण्यात भाजपाचा उमेदवार पदाधिकाऱ्यांकडून होणार निश्चित
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
नाशिकमध्ये आंदोलक आदिवासी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेश रोखला, सीबीएस चौकात ठिय्या

(हे ही वाचा: Video: …म्हणून सी लिंकवर उतरु नका; दोघांच्या अपघाती मृत्यूचं अंगावर काटा आणणारं वांद्रे-वरळी सी लिंकवरील CCTV फुटेज व्हायरल)

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोतला बिबट्या तुम्ही शोधू शकता का? बघा प्रयत्न करून)

द गार्डियनच्या वृत्तानुसार, एका नदीवर पादचारी पूल बांधण्यात आला होता. शहराचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी हा रिव्हरवॉक बांधण्यात आला होता. क्वेर्नावाका हे शहर राजधानी मेक्सिको सिटीच्या दक्षिणेस स्थित आहे आणि स्थानिक रहिवाशांमध्ये वीकेंड घालवण्यासाठी प्रसिद्ध आहे.