Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी मनोरंजन करणारे, तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका हळदीमध्ये भावा-बहिणीचं अतूट प्रेम पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

बहीण-भावामधील प्रेम आणि भांडणं ही जगजाहीर असतात. ही भावंडं एकमेकांबरोबर क्षणात भांडतात आणि क्षणात पुन्हा एकत्र येतात. सतत छोट्या-मोठ्या गोष्टींवरून बहिणीबरोबर वाद घालणारा भाऊ बहिणीच्या लग्नात सर्वांत जास्त रडताना दिसतो. आपल्या बहिणीच्या लग्नानंतर तिच्याबरोबरचं गोड भांडण कायमचं संपणार आणि ती आपल्याला दररोज दिसणार नाही, या विचारानं भावाला गहिवरून येतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपामध्ये नवरीचा भाऊ बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि नवरीला हळद लावायला येतो. यावेळी तो आधी नवरदेवाला हळद लावतो आणि त्यानंतर बहिणीला हळद लावतो. यावेळी बहिणीला हळद लावताना त्याला गहिवरून येतं आणि तो रडायला सुरुवात करतो. त्याला पाहून त्याची बहीणदेखील रडू लागते. भावा-बहिणीचं हे गोड प्रेम दाखविणार व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Pooja Sahani (@misspune_makeover_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @misspune_makeover_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही त्यावर कमेंट्स करीत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलंय, “खूप छान नातं”. दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप भावनिक क्षण”. आणखी एकानं लिहिलंय, “हे दृश्य पाहून मलाही रडू आलं”.