Viral Video: डान्स ही जगभरातील लोकांची आवडती कला मानली जाते. भाषा, देश आणि संस्कृती वेगवेगळ्या असल्या तरी नृत्याच्या माध्यमातून भावना व्यक्त करता येतात. त्यामुळे लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत अनेकांना डान्सची आवड असते. सोशल मीडियामुळे विविध देशांतील डान्सचे प्रकार आणि कलाकार सहज जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.
हल्लीची लहान मुलंही आपल्या कलागुणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. डान्स, गायन, अभिनय अशा विविध क्षेत्रांत चिमुकले आपल्या टॅलेंटची झलक दाखवत आहेत. विशेषतः सोशल मीडियामुळे या मुलांना आपली कला मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असून, त्यांच्या निरागस आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला नेटकऱ्यांकडूनही भरभरून दाद मिळत आहे.
सोशल मीडियामुळे गावाकडील लोकांनाही आपली कला जगासमोर सादर करण्याची मोठी संधी मिळाली आहे. पूर्वी केवळ स्थानिक कार्यक्रमांपुरती मर्यादित राहणारी डान्स, गायन, अभिनय किंवा इतर कलागुणांची झलक आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळण्यासोबतच आपल्या कलेची नवी ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि मुलगी ‘तुझा कृष्ण मुरारी, माझी छेड काढतो’ या गाण्यावर सुंदर अंदाजात डान्स करताना दिसत आहेत. गाण्याच्या तालावर दोघेही उत्साहाने नृत्याच्या स्टेप्स करत असून, त्यांचा निरागस अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या चिमुकल्यांचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @manishsanjaysonwne या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “छोटू आता इन्स्टग्राम तूच गाजवणार”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “भावा एकच नंबर डान्स केला आहेस तू”; तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच भारी डान्स केला दोघांनी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप मोठा डान्सर होशील बाळा तुला पुढील वाटचालीसाठी खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा, दीदीपेक्षाही छान डान्स केला आहे “
