Viral Video: सोशल मीडियावर सध्या स्क्रोल करता करताच हजारो डान्सचे व्हिडीओ समोर येतात. आपली कला सादर करण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकांचे रील्स तर अशाप्रकारे व्हायरल होतात की त्यांचा एक ट्रेंडच तयार होतो.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक मराठी तसेच हिंदी गाणी खूप चर्चेत आली आहेत. या गाण्यांवर अनेक कलाकारांनी, सोशल मीडिया स्टार्स आणि अनेकांनी रील्स करत, डान्स करत व्हिडीओज अपलोड केले, जे व्हायरल झाले. पण सध्या एका बहिण-भावाने मराठमोळ्या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. या गाण्यावरील डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
व्हायरल व्हिडीओ
“ही वीज तडफते हाय, पाव्हणं नाद करायचा न्हाय” या गाण्यावर बहिण-भावाने धम्माल डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर खूप गाजला आहे. यात लहान भावाने बहिणीचा ड्रेस घालून आणि डोक्यावर काळ्या रंगाचा स्कार्फ घालून डान्स केला आहे. अतिशय मजेशीर असा हा डान्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन्ही भावंड या गाण्यावर जबरदस्त थिरकताना दिसत आहेत. दोघांचीही एनर्जी आणि स्टेप्स इतक्या भारी आहेत की त्या बघूंन नेटकऱ्यांनी अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @miashiii_ka या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.५ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “मी आणि माझा पूकी भाऊ… नाद केला पण वाया गेला नाही” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “भावाच्या एक्सप्रेशन्सने बहीणीला हरवलं”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “भावा तुला मोठा झाल्यावर समजेल तुझ्या बहिणीने तुझ्यावर किती अन्याय केलाय ते”, तर तिसऱ्याने “करंट खूप हार्ड आहे, भाऊ काय नाचतो यार तू” अशी कमेंट केली. तर “दादा १० मतांनी आघाडी वर आहे” अशी एकाने कमेंट केली.
