Viral Video: प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना जंगलामध्ये घडल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर जंगलातील दृश्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ आपल्यासाठी केवळ एक थरारक घटना दाखविणारा क्षण असला तरीही तो शिकार करणाऱ्या आणि शिकार झालेल्या प्राण्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी घटना असते. खरे तर माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर, इतर प्राणी प्रत्येक दिवस जगताना मरणाची भीती बाळगून जगतात.
समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात एका बिबट्या हरणावर झडप घालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असणाऱ्या बिबट्याला एक हरिण दिसते. यावेळी तो हरणाचा जीव तोडून पाठलाग करतो. हरिणही प्रचंड चपळ असल्यामुळे जीवाच्या आकांताने धावतो आणि बिबट्यावर झडप घालतो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @Animalsvideo-s8b या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बिचाऱ्याचा अंत जवळ आला होता” दुसऱ्याने लिहिलेय, “बिबट्याची भूक भागली” तिसऱ्याने लिहिलेय, “वाईट अंत”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “अरेरे मला वाटलं हरिण वाचेल”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खतरनाक शॉट”
