viral video bus driver quotes : आपल्या आसपास घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टीदेखील आपल्याला आयुष्याचे महत्त्वाचे धडे देतात. फक्त, आपलं त्याच्याकडे लक्ष जाणे महत्वाचे आहे. रस्ता ओलांडताना योग्य निर्णय कसा घ्यायचा, खरेदी करताना हिशोब कसा ठेवायचा, ट्रेनमधील एखाद्या छोट्या विक्रेत्याकडून व्यवसायाची कल्पना कशी घ्यायची, हे सर्व अनुभव आपल्याला काही ना काही शिकवत असतात. त्यामुळे शिकण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील साध्या प्रसंगांतूनही निर्णयक्षमता, गणित आणि पैसे कमावण्याच्या कल्पना शिकता येतात.

आपण सकाळी उठल्यावर कामावर जायला निघण्यासाठी बस, ट्रेन, टॅक्सीमध्ये जेव्हा बसतो. तेव्हा आपल्या डोक्यात अनेक गोष्टी आपोआप सुरु होतात. इतरांना पहिले की, मी कधी बारीक किंवा जाड होणार, मी कधी इतका किंवा इतकी श्रीमंत होणार, अजून किती दिवस मेहनत करू, सगळ्यांचं होतंय माझंच का होत नाही ; असे डोक्यात १०० विचार येऊ लागतात. तर सोशल मीडियावर याचसोबत एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये मात्र एका बस चालकाने एक छान संदेश देऊन तुमच्या डोक्यात येणाऱ्या १०० प्रश्नांची उत्तरे २ वाक्यात दिली आहेत.

“सलाम त्या ड्राइवर भावला…” (Viral Video)

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बसचालकाने बसमधील आरशाजवळ एक सुंदर संदेश लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की,”आपली इतरांनाही बरोबरी करणे योग्य नाही. कारण – प्रत्येकाचा जीवनप्रवास वेगळा असतो”. ज्यामूळे नकळत बस मध्ये बसलेल्या एखाद्या तरी प्रवाशांचे याकडे लक्ष गेले. तर आपसूकच त्याच्या डोक्यातील विचार काही वेळासाठी नाहीसे होतील. अशाप्रकारे आपल्या केवळ आपले गुरुच सगळंकाही शिकवतात असं नाही तर वेगवेगळे अनुभव आणि प्रवासही आपल्याला काहीना काही शिकवत असतात. बसचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @s_artspace17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “हे खरंय” “क्या बात हैं! बेस्ट”, “सलाम त्या ड्राइवर भावला ज्याने हे वाक्य लिहिले आहे”, तर काही जण वेगवेगळ्या शब्दांत बस चालक आणि त्या सुंदर सुविचाराचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत…