scorecardresearch

वीज तुमच्या गाडीवर कोसळली तर? काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO पाहा

जर वीज अचानक तुमच्या अंगावर कोसळली तर? होय. अंगावर शहारे उभे राहिले असतील ना? अगदी असाच एक प्रसंग एका महिलेसोबत घडलाय.

Lightning-Strike
(Photo: Youtube/ WFLA News Channel 8)

Lightning Striking On Family Truck : वीज जेव्हा आकाशात कडाडत असते तेव्हाच आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि ती वीज कोसळताना पाहिलं की मग हृदयाचा ठोकाच चुकतो. कल्पना करा की, जर वीज अचानक तुमच्या अंगावर कोसळली तर? होय. अंगावर शहारे उभे राहिले असतील ना? अगदी असाच एक प्रसंग एका महिलेसोबत घडलाय. फॅमिली ट्रकमधून प्रवास करताना वीज कोसळून अगदी रस्त्यावर धावत्या ट्रकवर धडकली. इतका भयानक प्रसंग अनुभवल्यानंतर महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फ्लोरिडामधला आहे. रस्त्यावरून मायकेल मे व्हेलेन नावाची महिला तिच्या कारमधून प्रवास करत होती. तिच्या पतीच्या फॅमिली ट्रकच्या मागोमाग ती कारने येत होती. यात तिची तीन मुले होती, कारण ते सुट्टीचा आनंद घेऊन घरी जात होते. त्याचवेळी ढगांचा कडकडाट आणि वादळ सुरू झाले. यावेळी ही महिला आकाशात चमकणाऱ्या वीजा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करायला सुरूवात केली. त्याचवेळी एक वीज पतीच्या फॅमिली ट्रकवर कोसळली. हा भयानक क्षण तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.

आणखी वाचा : OMG! या चिमुकलीचा जबरदस्त स्टंट पाहून व्हाल हैराण, नेटकऱ्यांचा पालकांवर संताप!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘खूप जागा आहे, जागा नाही…’ बसमध्ये सीटसाठी दोन जणांच्या भांडणाचा हा VIRAL VIDEO पाहा

या घटनेत तिच्या पतीची फॅमिली पूर्णपणे जळून गेली. तिच्या कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेली नाही. ही घटना १ जुलै रोजी सनशाईन स्कायवे पुलाजवळ घडली. हिल्सबरो काउंटी शेरीफच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ पाहून सारेच जण आश्चर्यचकित होऊ लागले आहेत. विजेचा आतापर्यंत सर्वात भयंकर स्ट्राइक होता” असं काही युजर्सनी म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video captures lightning striking family truck on florida roadway watch prp