scorecardresearch

तिच्या गप्पांच्या नादात दोन गाड्या धडकल्या; विचित्र अपघात CCTV मध्ये कैद, आश्चर्यकारकरित्या ‘ती’ बचावली

महिलेच्या निष्काळजीपणामुळे हा गोंधळ झाल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट दिसत आहे.

तिच्या गप्पांच्या नादात दोन गाड्या धडकल्या; विचित्र अपघात CCTV मध्ये कैद, आश्चर्यकारकरित्या ‘ती’ बचावली
घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद

अपघातासंदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याचदा काही अपघात इतके भीषण असतात की नुसता व्हिडीओ पाहूनही अंगावर काटा येतो. असाच एक थरकाप उडविणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत एक महिला चमत्कारीतरित्या बचावली आहे. नुकताच हा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या व्हिडीओत तीन महिला रस्ता ओलांडतांना दिसत आहेत. समोरुन येणारे वाहन पाहून यातील दोन महिला थांबतात. मात्र, यातील एक महिला न थांबता रस्ता ओलांडतांना दिसत आहे. पण नेमकी त्याच वेळी एक पांढऱ्या रंगाची कार या महिलेला पाहून अचानक ब्रेक दाबते. समोरची गाडी अचानक थांबल्याने मागून येणारी काळ्या रंगाची गाडी या कारला धडकताना दिसते. पुढील कार डिव्हायरवर जाते तर मागची कारही धक्का बसल्याने थोड्या अंतरावर जाऊन थांबते. या दोन्ही गाड्या त्या महिलेच्या अगदी जवळून जातात. मात्र त्यानंतरही ही महिला अगदीच चमत्कारिकरित्या या अपघातातून सुखरूप बचावते. दोन्ही कारमधील छोट्याश्या अंतरामध्ये उभी असल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून ती थोडक्यात बचावते.

महिलेच्या निष्काळजीपणामुळे हा गोंधळ झाल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट दिसत आहे. या महिलेला धडक बसू नये म्हणून दोन्ही वाहन चालकांनी प्रयत्न केला आणि त्यातच या गाड्या आदळल्या. सुदैवाने, कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे दिसत नाही. व्हायरल हॉग या सोशल मीडिया हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जातोय या व्हिडिओची खूप चर्चा सगळीकडे होतेय .आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video careless pedestrian has miraculous escape as cars collide next to her in the middle of a road pdb

ताज्या बातम्या