Viral Video Cat Fight on Road Crow Provokes Ugly Fight Shocking Clip | Loksatta

Video: भररस्त्यात सुरु होती ‘कॅट फाईट’, इतक्यात एक पाहुणा आला अन त्या दोघींनी…

Viral Video Today: तुम्ही ट्रेनच्या डब्ब्यात भांडणारी माणसं पाहिली असतील ना? आता विचार करा याच रागात प्राणी भांडू लागले तर.. असाच दोन मांजरींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video Cat Fight on Road Crow Provokes Ugly Fight Shocking Clip
Viral Video Cat Fight on Road Crow Provokes Ugly Fight Shocking Clip (फोटो: रेडइट)

Viral Video Today: इंटरनेटवर दर दिवशी प्राण्यांचे शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. खेळणारे, हसणारे प्राणी बघून दिवसभराचा तणाव कमी व्हायला मदत होते. पण हे गोंडस दिसणारे प्राणी एकदा चिडले की मग अगदी आक्राळ विक्राळ रूप धारण करतात हे ही तितकंच खरं आहे. तुम्ही ट्रेनच्या डब्ब्यात भांडणारी माणसं पाहिली असतील ना? आता विचार करा याच रागात प्राणी भांडू लागले तर.. असाच दोन मांजरींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोन हिरोईनना लाजवेल अशा अविर्भावात या व्हिडिओमधील मांजरी भांडत आहेत आणि या भांडणाची मजा घेणारा पाहुणा भलताच आहे. नेमका काय आहे हा प्रकार चला तर पाहुयात…

रेडइटवर शेअर करण्यात आलेल्या या मांजरीच्या भांडणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. तर झालं असं की, भररस्त्यात दोन मांजरी भांडत होत्या एवढ्यात एक कावळा त्यांचं भांडण पाहण्यासाठी तिथे आला, बरं शांत बसून भांडण बघायचं तर हे कावळोबा मांजरींना आणखी भडकवायला लागले. सुरुवातीला मांजरींनी कावळ्याकडे दुर्लक्ष केले पण कावळ्याच्या प्रोत्साहनाने त्या मांजरी एकमेकींना आणखी रागाने मारू लागल्या. दर थोड्यावेळाने मांजरी दमून थांबल्या की कावळा त्यांना पुन्हा काहीतरी करून भडकवताना दिसत आहे तर मांजरी पण त्याच्या चिडवण्याने चिडून भांडत होत्या.

कावळ्याने सुरु केली कॅट फाईट, व्हायरल व्हिडीओ

ट्विटर CEO पद गेलं पण Linkedin वर पराग अग्रवाल यांना मोठा फायदा; गोष्टीत आहे ‘हा’ भलताच ट्विस्ट, पाहा

हा व्हिडीओ पाहून कावळ्यासारखीच मज्जा नेटकरीही घेत आहेत. कावळ्याने पण काय टाईमपास शोधलाय, हे बघून ट्रेनची आठवण आली अशा काहींनी कमेंट केल्या आहेत. तर माझेही मित्र मला भांडायला असंच प्रोत्साहन देतात असेही काहींनी म्हंटले आहे. तुम्हाला ही मांजरांची मारामारी पाहून कोणाची आठवण आली कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2022 at 10:14 IST
Next Story
रिक्षामधील प्रवाशांना मिळत आहेत मोफत चॉकलेट, बिस्कीट; चर्चेत असणारी Viral Autorickshaw पाहिलीत का?