Viral video: शेजारच्या भांडणात मांजरीने केला असा प्रँक, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही!

हा व्हिडिओ भारतीय सेवा अधिकारी रुपिन शर्मा आयपीएस यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

व्हायरल केलेल्या व्हिडीओला काही वेळातच हजारहून अधिक लोकांनी पाहिले आहे.(photo : @rupin1992 / Twitter)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. या व्हिडीओतील मांजरीची हालचाल पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणू शकाल की कलियुगात सर्व काही शक्य आहे. काही मांजरी पडद्याआडून त्यांच्या समोर सुरू असलेले भांडण पाहत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये मांजर शांतपणे काय पाहत असतात हे समजत नाही. नंतर व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसा कॅमेरा पुढे सरकतो, तर दुसरी मांजर दारात दोन्ही पायांवर उभी असते आणि शेजारच्या मांजरींकडे टक लावून पाहत असल्याच यामधून समजून येते. यावरून दारात उभ्या असलेल्या मांजरीच्या घरात कशावरून तरी भांडण झाल्याचे स्पष्ट होते. भांडणाचा आवाज शेजारी पोहचला की शेजारच्या मांजरी भांडण ऐकायला त्यांच्या व्हरांड्यात येतात.

त्याच वेळी शेजारच्या मांजरी शांतपणे त्यांच्या जागी थांबतात. त्याच वेळी, पहिली मांजर शेजारच्या मांजरींनकडे हळूच डोकावून पाहत असते. हे दृश्य पाहायला खूप गोंडस आहे. अनेकदा अशी परिस्थिती परिसरात होणार्‍या शेजारणीच्या भांडणानंतरही राहते. तेव्हा परिसरातील लोकं सुद्धा इच्छा असूनही हस्तक्षेप करू शकत नाहीत. या दरम्यान लोकं प्रेक्षक म्हणून समोर सुरू असलेली भांडण पाहत असतात. असाच काही प्रकार यावेळी या मांजरींनी केला आहे.

हा व्हिडिओ सेवा अधिकाऱ्याने केला शेअर

हा व्हिडिओ भारतीय सेवा अधिकारी रुपिन शर्मा आयपीएस यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. दरम्यान हा व्हायरल केलेल्या व्हिडीओला काही वेळातच हजारहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर काही लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि कमेंटही केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video cats enjoying neighbor fight scsm

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या