Jungle Viral Video: मनुष्य आपली दोन वेळची भूक भागवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. त्यासाठी बऱ्याचदा त्यांनादेखील खूप मेहनत घ्यावी लागते, युक्ती लढवावी लागते. सोशल मीडियावर अशा प्रकारचे प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

सोशल मीडियावरील जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांबाबतीतल्या अनेक गोष्टी पाहण्यासाठी युजर्सही नेहमीच उत्सुक असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता या हिंस्र प्राण्यांना नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अगदी आपली शिकार शोधण्यापासून ते ती शिकार मिळवण्यापर्यंत हे हिंस्र प्राणी खूप मेहनत घेतात. आता एका चित्ता आणि मगरीचा असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

हल्ली समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता नाही, ज्यात अनेकदा प्राण्यांच्या व्हिडीओंचादेखील समावेश असतो. या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर कधी हेच प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. शिकारीच्या व्हिडीओंमुळे आपला नेहमीच थरकाप उडतो. शिवाय हल्ली प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओही आपल्या कल्पनाशक्ती पलीकडचे असतात. खरंतर चित्ता म्हटलं तर मनुष्यांव्यतिरिक्त प्राण्यांचाही थरकाप उडतो. पण, अनेकदा चित्त्याचीच शिकार इतर प्राणी करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक मगर चित्त्यावर हल्ला करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका तलावामध्ये चित्ता पाणी पिण्यासाठी जातो. यावेळी तो तळ्याच्या काठावर उभा राहून तो मगरीच्या भितीने घाबरत घाबरत पाणी पिताना दिसतो. यावेळी पाण्यात लपून बसलेली एक मगर अचानक चित्त्यावर हल्ला करण्यासाठी सावध होते आणि डाव साधून त्याच्यावर हल्ला करते. चित्त्यासारख्या चपळ आणि हुशार प्राण्यावर मगरीने केलेला हल्ला पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @zunrong-l7m या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “मगरीचा पाणी पिणाऱ्या चित्त्यावर हल्ला” असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि पन्नास हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “बापरे खूपच भयानक”, दुसऱ्याने लिहिलंय की, “चित्त्याची मस्ती जिरली”; तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “भयानक दृश्य”