Jungle Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चित्ता एका हरणाची शिकार करण्यासाठी युक्ती आणि शक्तीचा अनोख्या पद्धतीने वापर करताना दिसतोय. हा थरकाप उडविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

जंगलातील प्रत्येक प्राणी हा अन्नसाखळीतील एका महत्त्वाच्या पातळीवर असतो. जंगलातील गवत, झाडांची पाने, फळे आणि बिया यावर हरीण, ससा, हत्ती, माकड यांसारखे शाकाहारी प्राणी जगतात. या शाकाहारी प्राण्यांची शिकार वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे मांसाहारी प्राणी करतात. तर साप, गरुड यांसारखे शिकारी प्राणी लहान प्राण्यांवर अवलंबून असतात. मृत प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष सूक्ष्मजीव विघटित करून मातीमध्ये पोषकद्रव्ये परत आणतात. अशा प्रकारे जंगलातील अन्नसाखळीमुळे ऊर्जेचा प्रवाह आणि पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो.

मनुष्य आपली दोन वेळची भूक भागवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. त्यासाठी बऱ्याचदा त्यांनादेखील खूप मेहनत घ्यावी लागते, युक्ती लढवावी लागते. सोशल मीडियावर अशा प्रकारचे प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

सोशल मीडियावर सध्या वन्यजीवांचे अनेक थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. अशाच एका व्हिडीओमध्ये चित्ता एका हरणाचा वेगाने पाठलाग करताना दिसत आहे. चित्त्याचा वेग आणि हरणाचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहून हा प्रसंग अंगावर काटा आणणारा ठरतो. जंगलातील अन्नसाखळी आणि निसर्गाचा समतोल याची झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळते. शिकारी प्राणी आणि त्यांची शिकार यांच्यातील हा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @JungleLarry-l6c या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यात कधी वाघाने, तर कधी चित्त्याने प्राण्यांची शिकार केली होती. अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यात कधी वाघाने, तर कधी चित्त्याने प्राण्यांची शिकार केली होती.