scorecardresearch

Viral Video : लहान मुलांमध्येही मुख्यमंत्री शिंदेंची तुफान क्रेझ; ‘या’ चिमुकल्याचा गणेशोत्सवातील लूक होतोय व्हायरल

सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या बाल एकनाथ शिंदेंना पाहून तुम्हालाही गंमत वाटेल.

Viral Video : लहान मुलांमध्येही मुख्यमंत्री शिंदेंची तुफान क्रेझ; ‘या’ चिमुकल्याचा गणेशोत्सवातील लूक होतोय व्हायरल
या बाल एकनाथ शिंदेंना पाहून तुम्हालाही गंमत वाटेल. (YouTube)

यंदा तब्बल २ वर्षांनी महाराष्ट्रात गणेशोत्सवाची रंगत पाहायला मिळाली. यावर्षी लोकांनी कोणत्याही निर्बंधांशिवाय आपला आवडता सण अगदी उत्साहात साजरा केला. ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय रंग चढल्याचेही दिसत होते.

सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत चर्चेत असतात. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी अनेक मान्यवरांना भेट दिली, तसेच अनेकांनी वर्षा निवासस्थानी शिंदे यांची भेट घेतली. यामुळे एकनाथ शिंदे चर्चेचा विषय ठरले होते. डमी एकनाथ शिंदे यांचा नाचताना किंवा बाप्पाची आरती करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या बाल एकनाथ शिंदेंना पाहून तुम्हालाही गंमत वाटेल.

नमकीन विकणाऱ्याचा हटके अंदाज पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रूप धारण केलं आहे. इंटरनेटवर हा लूक व्हायरल झाला असून नेटकरी या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत.

गच्च भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याला गेटवर लटकून करावा लागत होता प्रवास, अचानक हात सुटला आणि…; पाहा धक्कादायक VIDEO

एका गणेशोत्सव कार्यक्रमात या मुलाने एकनाथ शिंदे यांचे रूप धारण केले आहे. विशेष म्हणजे इतका लहान असूनही या मुलाचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. त्याने अगदी थाटात स्टेजवर प्रवेश केला. तो माईकवर काहीतरी बोलतानाही दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कुठचा आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र हे छोटे एकनाथ शिंदे इंटरनेटवर गाजले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video chief minister eknath shinde craze even among children boy ganeshotsav look is going viral pvp

ताज्या बातम्या