viral video child rescues snake from farms : सापांचं विश्व हे फारच चमत्कारिक असतं. या जगात सापाच्या अनेक प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती या विषारी आहेत तर काही विषारी नसतात. पण, तरीही साप बघताच किंवा पाहताच अनेकांना घाम फुटतो. पण, काही लोक असे असतात की, ज्यांच्यासाठी साप म्हणजे अगदी खेळणं. अशी माणसं सापाबरोबर खेळतात, त्याला अंगा-खांद्यावर खेळवतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये चक्क चिमुकल्याने सापाला हातात धरून

एक मूल शेतात चिखलात लोळताना दिसत आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हा कोणता खेळ आहे. पण, चिमुकला शेतात घुसलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी आला आहे. त्याने अगदी सहज सापाला हातात पकडले आणि गोल फिरवले, यादरम्यान सापाने दंश करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. पण, चिमुकल्याने अगदी चतुराईने सापाला इकडे तिकडे आपटायला सुरुवात केली. अखेर शेवटी तो मुलगा सापाला शेतातून हाकलून लावण्यासही यशस्वी झाला आहे.

“भाऊ, हा मृत्यूशी खेळत आहे” (Viral Video)

शेत, जंगल आणि गवताच्या मैदानात तसेच झाडाझुडूपांमध्ये साप आढळतात. बरेच लोक साप दिसल्यानंतर शक्यतो लोक त्याला घाबरून मारतात किंवा त्याच्यापासून दूर पळतात. पण, या चिमुकल्याने सगळ्यांनाच धक्का दिला. थेट सापाला हातात घेऊन तो शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. सापनेही चिमुकल्यावर दंश करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, चिमुकल्याच्या हिंमतीने त्यालाही माघार घ्यायला भाग पाडले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Babaxwale या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून युजर्स आश्चर्य, तर काही जण धाडसाचे कौतुक तर अनेक जण चिंता व्यक्त करतानाही दिसले आहेत आणि “हे मूल सापापेक्षा जास्त धोकादायक आहे”, “भीती? ती काय असते; हे मूल तर खरोखर धाडसी निघालं यार”, “मुलाने हे करायला नको होते. जीवघेणे ठरले असते . तो थोडक्यात बचावला”, “भाऊ, हा मृत्यूशी खेळत आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.