scorecardresearch

Premium

“२००० च्या नोटांसाठी शहीद..” लहान मुलांनी मातीच्या Piggy Bank मध्ये साठवले होते पैसे; मडकं फोडल्यानंतर निघाल्या असंख्य नोटा

Video: या व्हायरल व्हिडीओला तब्बल २४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच त्यावर १ मिलियन लाइक्स आहेत.

2000 rs note pot piggy bank video
व्हायरल व्हिडीओ (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Viral Video: भारतीय रिझर्व्ह बॅंक काही दिवसांपूर्वी भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटेसंबंधित मोठी घोषणा केली होती. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार असून त्यांवर आरबीआयकडून बंदी घालण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली होती. या घोषणेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. २०१६ मध्ये नोटाबंदीप्रमाणे यावेळेस ही नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लावायला लागणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. या एकूण प्रकरणावर सोशल मीडियावर मोठा गोंधळ झाला होता. तेव्हापासून नोटाबंदीशी निगडीत असंख्य मीम्स, व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची खूप चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं त्याचा मातीच्या मडक्याची Piggy Bank फोडत असल्याचे दिसते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं हातामध्ये एक मोठ्ठं मातीचं मडकं घेऊन उभी आहेत. त्या मडक्याचा वापर त्यांनी पिगी बॅंक म्हणून केला आहे. त्या मडक्यावर ‘२००० च्या नोटांसाठी शहीद करावे लागत आहे’ असे लिहिले आहे. पुढे त्या मुलांची आई त्यांच्याकडून पिगी बॅंक हातात घेते आणि सोडून देते. असे केल्याने ते मडकं फरशीवर धाडकन आपटून फोडून जातं. त्या मडक्यातून असंख्य नोटा पाहायला मिळतात. मडकं फोडल्यावर ती दोन्ही मुलं त्या नोटा हातांमध्ये घेतात आणि नोटा हवेमध्ये फेकत खेळायला लागतात.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

आणखी वाचा – MBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला! महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

@thevasimbuilder या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २४ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. १ मिलियनपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओवर पाहायला मिळकत आहेत. तसेच ३ लाखांपेक्षा जास्त यूजर्सनी व्हिडीओ शेअर देखील केला आहे. व्हिडीओतील नोटांप्रमाणे व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स दिसत आहेत. एका यूजरने ‘मी तर ५ रुपयांचं नाणं पिगी बॅंकमध्ये टाकतो आणि अर्धा तासात पुन्हा बाहेर काढतो’ असे गमतीने म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘या घरावर आयकर विभागाची धाड पडणार आहे’ अशी कमेंट केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 13:34 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×